
रत्नागिरीत आज दिवसभर श्रावणधारा कोसळत होत्या.संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.रत्नागिरीत वाहतूक करणाऱ्या एसटीच्या बसमध्येही “श्रावणधारा” कोसळत होत्या.गळक्या बसमुळे आता प्रवास करताना बसमध्येही रेनकोट घालायची वेळ प्रवाशांवर आली आहे.
आज दिवसभर रत्नागिरीला पावसाने झोडपून काढले. शहरातील रस्ते जलमय झाल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण झाला होता. भरपावसात गळक्या बसमध्येही पाणी थेंब थेंब गळण्याचा अनुभव प्रवाशांना येत आहे.रत्नागिरी शहरात वाहतूक करणाऱ्या एसटीच्या बसमध्ये “श्रावणधारां” चा अनुभव प्रवाशांना मिळत आहे.