रत्नागिरीत अडकलेल्यांसाठी उद्यापासून एसटी सेवा, परवानगी प्राप्त नागरिकांनाच करता येणार प्रवा

639
st bus
फाईल फोटो

लॉकडाऊनमध्ये रत्नागिरीत जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांनी केलेल्या विनंती अर्जानुसार मंजूरी प्राप्त झालेल्यांना राज्यातील इतर जिल्ह्यात पाठविण्याची तयारी पूर्ण झाली असून अशा सर्वांना उद्या शुक्रवार दि. 08 मे 2020 रोजी पासून जिल्हयातील विविध बसस्थानंकावरुन एस.टी. मार्फत जाता येणार आहे. अशा एकूण 25 बसेस शुक्रवारी जिल्हयातून निघतील.

लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर सर्व वाहतूक बंद करून जिल्हयांच्या सीमा सील करण्यातल आल्या. त्यानंतर दोन वेळा लॉकडाऊनची मुदत वाढवली. त्यामुळे अनेकजण रत्नागिरीत अडकून पडले आहेत. याबाबत राज्यात झालेल्या निर्णयानुसार आता जिल्हयात अडकून पडलेल्या नागरिकांना त्यांच्या गावी जाणे शक्य होणार आहे. नागरिकांना यासाठी अर्ज करण्यास सांगण्यात आले होते. प्राप्त अर्जातील पहिल्या टप्प्यातील मंजूर अर्जांनुसार नागरिकांना या गाडयांमधून विविध जिल्हयांमध्ये जाण्याची सोय उपलब्ध झाली आहे.

उद्यापासून जिल्हातील विविध बसस्थानकांमधून सिंधुदुर्ग, रायगड (अलिबाग), बुलढाणा, लातूर, भंडारा, सातारा, गोंदिया आणि अमरावती या 8 जिल्हयांना जाणाऱ्या बसेस सुटतील.यात ज्यांच्याकडे अशा प्रवाशाची परवानगी आहे अशांनीच आपापल्या शहरातील बसस्थानकावर वेळेच्या 2 तास आधी पोहचायचे आहे. प्रत्येक प्रवाशाकडे आरोग्य तपासणी पत्र असणे अनिवार्य आहे. प्रत्येकांने मास्क वापरणे बंधनकारक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या