रत्नागिरीत तिसरा कोरोना रुग्ण सापडला

669

रत्नागिरीत कोरोनाचा आणखी एक रुग्ण सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. रत्नागिरी तालुक्यातील साखरतर येथील 52 वर्षाच्या महिलेला कोरोनाची लागण झाली आहे.

4 एप्रिलला या महिलेला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काल या महिलेचा स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला होता, तिचा अहवाल आज प्राप्त झाला असून ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा सापडलेला हा तिसरा रूग्ण आहे.

यापूर्वी गुहागर तालुक्यातील शृंगारतळीतील एक, रत्नागिरी तालुक्यात राजिवडा येथे आलेली एका व्यक्ती कोरोनाबाधित सापडली होती. त्यानंतर साखरतर येथे कोरोनाबाधित रूग्ण सापडला आहे. राजिवडा सारख्या दाटीवाटीच्या परिसरात कोरोनाचा रूग्ण सापडल्यानंतर साखरतर येथे कोरोनाचा रूग्ण सापडल्याने खळबळ उडाली. हा परिसर ही दाटीवाटीचा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या