पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवस कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद मेमोरियल येथे ध्यानधारणेसाठी गेले होते. त्यांच्या या ध्यानधारणेचे वेगवेगळ्या अँगलमधून फोटो शेअर करण्यात आले आहेत. भाजप नेते त्यांच्या या ध्यानधारणेचे कौतुक करताना थकत नाहीएत. अशातच भाजप उमेदवार रवी किशन यांनी मोदींची स्तुती करताना अकलेचे तारे तोडले आहेत.
लोकसभा निवडणूकीचे अंतिम टप्प्याचे मतदान शनिवारी देशभरात पार पडले. उत्तर प्रदेशमध्ये देखील काही जागांवर सातव्या टप्प्यात मतदान पार पडले. यात रवि किशन यांचा मतदारसंघ असलेल्या गोरखपूरमध्ये देखील शनिवारी मतदान पार पडले. गोरखपूरचे खासदार असलेले रवी किशन यांनी पहिल्यांदाच गोरखपूरमधून मतदान केलं. त्याविषयी त्यांची प्रतिक्रीया विचारली. त्याबाबत बोलताना रवी किशन यांनी विचित्र वक्तव्य केलं आहे.
”पहिल्यांदा गोरखपूरमध्ये मतदान करून खूप मस्त वाटत आहे. ऐतिहासिक वाटत आहे. सध्या वातावरण देखील एकदम मस्त झाले. मोदीजी ध्यानधारणा करत आहेत. त्यामुळे सूर्यदेवता देखील शांत झाला आहे. हे ऐतिहासिक आहे. भीषण गरमीत थंड वाटू लागले आहे. हे रामराज्याचे संकेत आहेत. तिसऱ्यांदा प्रधानमंत्री मोदीजी विराट रुपात येणार आहेत”, असे वक्तव्य रवी किशन यांनी केले आहे.