
हिंदुस्थानच्या क्रिकेट विश्वात अभिषेक शर्मा या नव्या सुपरस्टारचा झंझावाती उदय झाला आहे. आगामी टी-20 वर्ल्ड कपवर शर्माच्याच खेळीने अभिषेक केले जाईल. तोच वर्ल्ड कपमध्ये सामने फिरवणारा खरा गेमचेंजर ठरेल, असा विश्वास आणि भाकित माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केला. 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक प्रभाव पाडणारा खेळाडू अभिषेक असेल, याबाबत कोणतीही शंका नसल्याचेही शास्त्राr मुंबईतील एका कार्यक्रमात म्हणाले.
अभिषेक सध्या जबरदस्त फार्मात आहे. त्याचा आत्मविश्वास आणि बेधडक दृष्टिकोन त्याला जगातील सर्वात धोकादायक टी-20 फलंदाजांच्या पंक्तीत स्थान देतो. घरगुती परिस्थितीचा लाभ मिळाल्यास तो आणखी आक्रमक होईल. नागपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात 35 चेंडूंत 84 धावांची खेळी करून त्याने आपली क्षमता दाखवली असल्याचे रवी शास्त्राr यांनी बोलून दाखवले.
आत्मविश्वासच मोठी ताकद
अभिषेकची खरी ताकद म्हणजे त्याचा आत्मविश्वास. पॉवर प्लेमध्ये आक्रमक सुरुवात, फिरकीविरुद्ध बिनधास्त फटकेबाजी आणि सातत्याने मोठय़ा धावसंख्या उभारण्याची क्षमता, यामुळे हिंदुस्थानचा सामन्यावर दबाव कायम राहतो. अनेकदा 230 पेक्षा जास्त धावा उभारण्यात त्याचा निर्णायक वाटा राहिला आहे. थोडक्यात, या विश्वचषकात ‘गेमचेंजर’ कोण, याचे उत्तर शास्त्राRनी अभिषेक शर्मा असे दिलेय.






























































