RBI 500 ची नोट बंद करण्याच्या तयारीत?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील सर्व बँकांना सप्टेंबर 2025 पर्यंत बँकांच्या एटीएममध्ये फक्त शंभर व दोनशेच्या नोटा जमा करण्याचे आदेश दिले आहेत. एकंदरीत आरबीआय चलनातून 500 रुपयांच्या नोटा कमी व 100 व 200 च्या नोटांचा वापर वाढवायचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येत्या काही काळात सरकार 2000 च्या नोटेप्रमाणेच 500 ची नोट देखील बंद करू शकते अशी चर्चा सध्या रंगली आहे.

जसे आरबीआयने 2000 ची नोट हळू हळू चलनातून पूर्णपणे हटवली आहे. तशीच आता पाचशेची नोट देखील हटवली जाऊ शकते. त्यासाठीच आरबीआयने पाचशेच्या नोटा देखील कमी प्रमाणात छापण्यास सांगितल्या आहेत. त्यामुळे हळू हळू पाचशेच्या सर्व नोटा आरबीआयकडे परत येतील.