
RBI कडून यंदा सर्वसामान्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. रेपो दरात कोणताही बदल न करता ते जैसे थे ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे व्याजाच्या ईआयमध्ये कोणताही बदल होणार नाही. केंद्रीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर ५.२५% वर कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कर्जाच्या ईएमआयवर कोणताही परिणाम होणार नाही. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले की, रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय चलनविषयक धोरण बैठकीत घेण्यात आला.
एमपीसी बैठकीच्या निर्णयाबाबत माहिी देताना, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, जागतिक स्तरावर अनिश्चितता कायम असली तरी, देशातील महागाई नियंत्रणात आहे. महागाई आरबीआयच्या मर्यादेपेक्षा कमी आहे. महागाई ४% च्या आसपास आहे, याचा अर्थ असा की आपले उद्योग क्षेत्र आणि देशावर महागाईचा कोणाताही मोठा परिणाम झालेला नाही.
संजय मल्होत्रा म्हणाले की, देशाला जीडीपी आणि महागाई दोन्हीसाठी नवीन आधार मिळेल. देशाची अर्थव्यवस्था लवचिक आहे आणि देशांतर्गत महागाई आणि वाढ सकारात्मक आहे. केंद्रीय बँकेने २०२५-२६ आर्थिक वर्षासाठीचा वाढीचा अंदाज ७.३% वरून ७.४% पर्यंत सुधारित केला आहे. त्यांनी सांगितले की २०२६ च्या अर्थसंकल्पात जाहीर केलेले अनेक उपाय विकासासाठी अनुकूल असतील आणि सेवा निर्यात मजबूत राहील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. २०२६ च्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अनेक उपाययोजना विकासासाठी अनुकूल असतील आणि सेवा निर्यात मजबूत राहील. शिवाय, त्यांनी हिंदुस्थान-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार आणि हिंदुस्थान-अमेरिका व्यापार कराराचाही उल्लेख केला. ते म्हणाले हे व्यापार करार देशाच्या निर्यातीला बळकटी देतील.
रेपो दर अपरिवर्तित राहिल्यानंतर, शेअर बाजारात घसरण झाली. सेन्सेक्स ३४० अंकांनी घसरून ८३,००० च्या खाली आला, तर निफ्टी १५० अंकांनी घसरून २५,५०० च्या खाली आला. बँक निफ्टी देखील जवळपास ३०० अंकांनी घसरला. ऑटो, बँकिंग आणि रिअल इस्टेट शेअर्समध्ये आज घसरण झाली. बीएसई ऑटो इंडेक्स ५४२ अंकांनी घसरून ६०,८०३ वर आला, तर बीएसई बँकेक्स १५८ अंकांनी घसरून ६७,३७८ वर आला. बीएसई रिअॅल्टी इंडेक्सही ४९ अंकांनी घसरून ६,३४३ वर आला.


























































