चलनविषयक धोरण समिती बैठकीची तारीख बदलली

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने पुढील चलनविषयक धोरण समिती (एमपीसी) बैठकीची तारीख बदलली आहे. 5 ते 7 ऑगस्ट 2025 रोजी होणारी बैठक आता 4 ते 6 ऑगस्टदरम्यान होईल, असे आरबीआयने स्ष्ट केले आहे. रिझर्व्ह बँकेने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) 6 बैठकांचे वेळापत्रक जाहीर केले. या आर्थिक वर्षाच्या दोन बैठका आधीच झाल्या आहेत. पहिली बैठक 7 ते 9 एप्रिल आणि दुसरी बैठक 4 ते 6 जूनदरम्यान पार पडलीय. चार बैठका अद्याप बाकी आहेत. पुढील बैठक ऑगस्टमध्ये होणार आहे.