
युरोपमधील बलाढ्य क्लब म्हणून ओळखला जाणारा रियाल माद्रिदचा संघ ला लीगा या स्पेनमधील स्पर्धेत जेतेपद पटकावण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. रियाल माद्रिदने ग्रॅनडा संघावर २-१ अशा फरकाने विजय मिळवत अिंजक्यपद पटकावण्याच्या दिशेने पाऊल टाकले. आता रियाल माद्रिद व र्बािसलोना यांच्यामध्ये चार गुणांचा फरक आहे.
रियाल माद्रिदचे दोन सामने बाकी आहेत, पण येत्या गुरुवारी होणाऱ्या लढतीत त्यांनी विलारियाल संघाला हरवले तर त्यांचे ला लीगा स्पर्धेचे जेतेपद निश्चित होईल. अशा परिस्थितीत बार्सोलिनाने ओसासुनाला पराभूत केल्यानंतरही त्यांना अिंजक्यपदाच्या शर्यतीत राहता येणार नाही. आगामी लढतीत रियाल माद्रिदने विजय मिळवल्यास अल्फ्रेडो स्टेडियममध्ये गेल्या आठ वर्षांत तिसऱ्यांदा ला लीगा चॅम्पियन होण्याचा मान संघाला मिळणार आहे.
आपली प्रतिक्रिया द्या