
Realme GT Master Edition चा स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 8 GBचा रॅम देण्यात आला आहे. हा फोन फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार असून मोठ्या प्रमाणात डिस्काऊंटही देण्यात आले आहे.
फोनमध्ये Qualcomm Snapdragon 778G देण्यात आला आहे. तसेच Octa Core प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनच्या बॅटरीची क्षमता 4300 mAh इतकी आहे. फोनमध्ये लेटेस्ट अँड्रॉईड सिस्टम 11 देण्यात आला आहे. फोनमध्ये 5G ही आहे.
फोनमध्ये 6 GB 8 GBचा रॅम असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. फोनमध्ये 128 GB इंटर्नल मेमरी देण्यात आला आहे. फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. 8 मेगापिक्सलचा वाईड अँगल कॅमेरा 2 मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा देण्यात आल आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
6 GB RAM असलेल्या फोनची किंमत 25 हजार 999 इतकी आहे. फ्लिपकार्टवर बिग बिलियन सेलच्या दिवशी हा फोन 20 हजार 999 रुपयांना मिळणार आहे. तर 8 GB रॅम असलेल्या फोनची किंमत 27 हजार 999 इतकी असून सेलच्या दिवशी 24 हजार 999 वर मिळणार आहे. फोन विकत घेण्यासाठी सुलभ हफ्त्यांचीही सुविधा देण्यात आली आहे.



























































