
रियलमीने आपली 16 प्रो सीरिज हिंदुस्थानात लाँच केली. या सीरिजअंतर्गत कंपनीने रियलमी 16 प्रो आणि रियलमी 16 प्रो प्लस हे दोन पह्न लाँच केले. रियलमी बड्स एयर 8 (3,799 रुपये) आणि रियलमी पॅड 3 (26,999 रुपये) ही लाँच केले. या दोन्ही फोनमध्ये 200 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा, 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि 7000 एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. रियलमी 16 प्रो 5जी ची किंमत 31 हजार 999 रुपयांपासून सुरू होते. या फोनला तीन स्टोरेजमध्ये आणले आहे. रियलमी 16 प्रो 5जी च्या 8 जीबी रॅम प्लस 128 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 39 हजार 999 रुपये आहे. तर या फोनच्या टॉप व्हेरियंटची किंमत 44 हजार 999 रुपये आहे. फोनवर 4 हजार रुपयांचा बँक डिस्काऊंट मिळत आहे.



























































