शिंदे गटात नगराध्यक्षपदासाठी बंडखोरी; संध्या कोसुंबकर यांच्या अपक्ष अर्जाने महायुतीची डोकेदुखी वाढली

रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत शिंदे गटाला बंडखोरीचा फटका बसला आहे. शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्या संध्या कोसुंबकर यांनी सोमवारी नगराध्यक्षपदासाठी अपक्ष अर्ज भरला. भारतीय जनता पक्षाला सहा जागा मिळाल्याने अनेक प्रभागात बंडखोरीचा फटका बसला आहे.

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवारांनी तर नगरसेवक पदाच्या ३२ जागांसाठी ९० उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.