रेसिपी – चिकन हॉट शॉट्स

pratik-poyrekar-chefहल्ली नॉनव्हेज चाहत्यांची संख्या वाढत चालली आहे. नॉनव्हेज म्हटलं की मेनकोर्स पेक्षा स्टार्टर सर्वजण आवडीने खातात. म्हणूनच शेफ प्रतीक पोयरेकर यांनी आज आपल्यासाठी सोप्या पद्धतीने बनवता येईल असे इंडियन पण थोडे वेगळे ट्विस्ट असलेल्या स्टार्टरची रेसिपी दिली आहे. 

साहीत्य :
बोनलेस चिकन, लाल तिखट, धणे पावडर, हळद, दही, कडीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची, टोमॅटो केचअप, मक्याचे पीठ (कॉर्नफ्लोअर), तेल, बारिक चिरलेली कोथिंबीर

कृती:

1. चिकनचे एका इंचाचे बारिक तुकडे करून ते स्वच्छ धुवून घ्या.
2. एका बाऊलमध्ये मक्याचे पीठ, लाल तिखट, धणे पूड, दही, मीठ योग्य प्रमाणात घेऊन त्यात चिकन टाका. चिकन 4 ते 5 तास मॅरिनेट करा.
3. कढईमध्ये तेल गरम करून त्यात चिकनचे तुकडे खरपूस तळून घ्या.
4. दुसऱ्या पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकून त्यात कडीपत्ता मोहरी, बारिक चिरलेली मिरची टाका. त्यात चिकनचे तळलेले पिस टाका. चिकन पुन्हा व्यवस्थित भाजून घ्या.
5. त्यात टोमॅटो सॉल घाला व व्यवस्थित परतून घ्या. सॉस सर्व चिकनच्या तुकड्यांना लागून सुकेपर्यंत परता. गरमा गरम सर्व्ह करा
6 सर्व्ह करताना वरून बारिक चिरलेली कोथिंबीर कापून टाका.

आपली प्रतिक्रिया द्या