चमचमीत रेसिपी – ओट्स पोहे

3339

डाएटवर करणारी लोकं ही चमचमीत पदार्थ खाण्यासाठी ओट्सचा वापर करतात. हे ओट्स वेगवेगळ्या प्रकारे तयार करून डाएट करणारे त्यांच्या जीभेचे चोचले पुरवत असतात. त्यामुळे शेफ प्रतिक पोयरेकर यांनी डाएट करणाऱ्यांसाठी ओट्स पोहे ही वेगळी रेसिपी दिली आहे. 

साहित्य –
1 वाटी ओट्स
अर्धा कांदा मध्यम चिरलेला
2 चमचे तेल
1 लहान चमचा मोहरी
5-6 कढीपत्त्याची पाने
चवीनुसार मीठ
दोन मिरच्या बारीक चिरून
1 उकडलेला बटाटा
अर्धा चमचा हळद
बारीक चिरलेली कोथिंबीर
आवडीनुसार शेंगदाणे
1 लिंबु

कृती
1 एका भांडयात ओट्स घ्या त्यावर हलके पाणी शिंपडून त्यांना भिजवून घ्या.

2 एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी व कढीपत्ताची फोडणी द्या. त्यात कांदा, बारिक मिरची घालून परतुन घ्या. शेंगदाणे घाला.

3. त्यात हळद, मीठ, उकडलेला बटाटा घालून परता. त्यात भिजवलेले ओट्स घाला.

४. कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा. सोबत लिंबाची फोड़ ठेवा.

आपली प्रतिक्रिया द्या