चमचमीत रेसिपी – मेथी मलाई चिकन

4139

साहित्य –

अर्धा किलो बोनलेस चिकन, शाही जीरं, 2 कांदे बारिक चिरून, आलं लसून पेस्ट एक चमचा, हिरव्या मिरच्या, मीठ, तेल, गरम मसाला, मीर पूड, कसूरी मेथी, मलई अर्धा कप, एक कप दही

कृती –

– गॅसवर टोप ठेवून त्यात दोन चमचे तेल टाका. त्यात फोडणीला शाही जीरं घाला.

– त्यावर बारिक चिरलेला कांदा घाला व व्यवस्थित परतून घ्या. त्यावर आलं लसून पेस्ट व बारिक चिरलेली मिरची घाला.

– त्यात चिकन घालून व्यवस्थित परतवा. वरून हळद घाला.

– दही व्यवस्थित फेटून मग ते चिकनमध्ये घाला. भांड्यावर झाकण ठेवून चिकन व्यवस्थित शिजवून घ्या.

– चिकन शिजल्यावर वरून गरम मसाला व मीर पूड घाला. व्यवस्थित परतून घ्या.

– परतल्यावर वरून कसूरी मेथी घाला. पुन्हा परता व 15 मिनिटं शिजू द्या.

– त्यानंतर फ्रेश क्रिम घाला. 10 मिनिटं मध्यम गॅसवर शिजू द्या.

– मलाई मेथी चिकन तयार आहे. हे तुम्ही पराठा, रोटी, भात, पुलावसोबतही खाऊ शकता.

आपली प्रतिक्रिया द्या