म्हाडाच्या ठाणे, नवी मुंबईतील घरांसाठी रेकॉर्डब्रेक अर्ज

म्हाडा कोकण मंडळाच्या 5,285 घरांसाठी अर्ज करण्याची मुदत आता संपली आहे. शनिवारपर्यंत या घरांसाठी 1 लाख 84 हजार 994 अर्ज प्राप्त झाले असून 1 लाख 54 हजार 427 जणांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या मुंबईतील घरांच्या सोडतीसाठी सवा लाखांच्या आसपास अर्ज प्राप्त झाले होते. मुंबईपेक्षा कोकण मंडळाच्या घरांसाठी यंदा रेकॉर्डब्रेक अर्ज आले आहेत. नवी मुंबईतील दिघा, नेरूळ, सानपाडा, घणसोली येथील घरांचा लॉटरीत समावेश केल्यामुळे अर्जदारांची संख्या वाढल्याची चर्चा आहे. कोकण मंडळाच्या 5,285 घरांमध्ये
20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एपूण 565 घरे, 15 टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत 3002 घरे, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेली 1677 घरे तसेच 50 टक्के योजनेअंतर्गत 41 घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.