
दक्षिण मध्य रेल्वेने अॅप्रेंटिस पदांच्या एकूण 2801 पदांसाठी भरती सुरू केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली असून अखेरची तारीख 11 एप्रिल 2026 पर्यंत आहे. भरतीसंबंधी सविस्तर माहिती scr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. अर्ज करणारा उमेदवार कमीत कमी 50 टक्क्यांसोबत दहावी उत्तीर्ण असायला हवा. तसेच त्याच्याकडे संबंधित ट्रेडमध्ये आयटीआयचे प्रमाणपत्र असायला हवे. उमेदवाराचे दहावीतील गुण आणि आयटीआयमधील गुण मिळून यादी तयार केली जाईल. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्जासोबत 100 रुपयांचे शुल्क द्यावे लागेल.


























































