नाबार्डमध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर्स पदांची भरती

नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रीकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट अर्थात नाबार्डमध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर्स पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जून 2025 पर्यंत आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे एमए, एमएससी मास्टर्सची पदवी असणे आवश्यक आहे. तसेच 1 ते 10 वर्षांचा अनुभव असणे गरजेचा आहे. निवड झालेल्या उमेदवारांना मुंबईतील नाबार्डच्या मुख्यालयात काम करण्याची संधी मिळेल. शैक्षणिक पात्रता आणि निवड झालेल्या उमेदवारांचा पगार यासंबंधीची सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईट
www.nabard.org वर देण्यात आली आहे.