युनियन बँकेत 250 जागांसाठी भरती

युनियन बँक ऑफ इंडियामध्ये 250 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. वेल्थ मॅनेजर (स्पेशलिस्ट ऑफिसर) असे या पदाचे नाव असून पात्र उमेदवार या पदासाठी 25 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतील. उमेदवाराकडे शैक्षिणक पात्रतामध्ये एमबीए, एम पीजीडीबीए आणि 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय 25 ते 35 वर्षांपर्यंत असायला हवे. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईट https://ibpsonline.ibps.in वर देण्यात आली आहे.