नववी, अकरावी नापासांची फेरपरीक्षा होणार, शासन निर्णय जारी

351
exam
प्रातिनिधिक फोटो

नववी, अकरावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याबाबतचा शासन निर्णय बुधवारी शालेय शिक्षण विभागाने जारी केला. कोरोनामुळे लेखी परीक्षा घेणे शक्य नसल्याने नापास विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत बोलावून किंवा व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांची तोंडी परीक्षा घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाने शाळांना दिल्या आहेत. नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा 7 ऑगस्टपर्यत घ्यायची असून या परीक्षेत पास होणार्या विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीत प्रवेश द्यायचा आहे. शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे नापास विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षेचा प्रश्न आता सुटला असून त्यांचे वर्ष वाचणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या