‘आनंदाचा शिधा’ निविदा प्रक्रिया रोखण्यास नकार

गौरी-गणपती सणानिमित्त राज्यातील जनतेला ‘आनंदाचा शिधा’ पुरवण्याच्या निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. गणेशोत्सवाला काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे या अंतिम टप्प्यात निविदा प्रक्रिया थांबवता येणार नाही. प्रत्येक जिह्यात ‘आनंदाचा शिधा’ वेळेत पोहोचला पाहिजे, असे स्पष्ट करत न्यायालयाने निविदा प्रक्रियेला आक्षेप घेणाऱया याचिका फेटाळल्या. मिंधे सरकारच्या पक्षपाती भूमिकेविरोधात पेंद्रीय भंडारसह इंडो अलाईड प्रोटीन फूड्स, गुनीना कमर्शिअल्स या पंपन्यांनी रिट याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने आज जाहीर केला.