वैद्यकीय अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांना नियमित करा, निवेदनाद्वारे मंत्र्यांकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय अस्थायी सहाय्यक प्राध्यापक सेवा नियमित करण्यासाठी जेजे रूग्णालयात 14 दिवसांपासून साखळी उपोषण करत आहेत. या डॉक्टरांनी आपल्या प्रश्नांसाठी आज परिवहनमंत्री अनिल परब, राज्यमंत्री बच्चू कडू तसेच आमदार कपिल पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी सहाय्यक प्राध्यापक प्रतिनिधी स्वरुपात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व वैद्यकीय शिक्षणमंत्री यांनी कोरोना लाटेत दिलेले आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी साखळी उपोषण करत आहेत. कोणत्याही आर्थिक तरतूद न करता या कोरोना योद्ध्यांना न्याय देता येऊ शकतो किंबहुना 2009 व 2016 मध्ये सेवा नियमित करण्यात आले होते. असे असताना वैद्यकीय शिक्षण विभागाकडून कोरोना योद्धय़ांना न्याय का मिळत नाही, असा सवाल या अस्थायी प्राध्यापकांकडून केला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घ्यावी अशी मागणी केली आहे.