
सामना ऑनलाईन । मुंबई
देशातील रियल इस्टेट इन्वेसमेंट म्हणजे रीट्सचा पहिला आयपीओ बाजारात येत आहे. बंगळुरूतील एंबेसी ऑफिस पार्क कंपनीचा हा आयपीओ 18 मार्चपासून सुरू होणार आहे. रीट्स आयपीओची पाइस बँड 299 ते 300 रुपये प्रतीयुनिट असेल. गुंतवणूकदारांना कमीतकमी 800 युनिट विकत घ्यावे लागतील.त्यापुढे 400 पटीत युनिट विकत घेता येणार आहेत. या आयपीओतून कंपनी 4750 कोटी रुपये जमवणार आहे.कंपनीकडे 11 कमर्शिअल एस्टेटसोबत 3.1 लाख वर्गफूटांचा पोर्टफोलिओ आहे.
एनएससी आणि बीएससीसह प्रमुख शेअर ब्रोकरकडून हे आयपीओ विकत घेता येणार आहे. 18 मार्चला आयोपीओ बाजारात येणार असून 20 मार्चपर्यंत ते विकत घेता येणार आहेत.































































