रेखा दांडेकर यांचे दीर्घ आजाराने निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

दैनिक सामनाचे वरिष्ठ पत्रकार नवनाथ दांडेकर यांच्या पत्नी रेखा दांडेकर यांचे शनिवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती व एक मुलगी असा परिवार आहे.

रेखा दांडेकर या काशिमीरा येथील सेंट जोरुम कॉन्व्हेंट शाळेत शिक्षिका होत्या. अंत्यत मनमिळाऊ व बोलक्या स्वभावामुळे रेखा दांडेकर या त्यांच्या क्षेत्रात आणि आप्तेष्टांमध्ये प्रसिद्ध होत्या. त्यांच्या अकस्मात जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांना, नातेवाईकांना जबर धक्का बसला आहे.