बोठेच्या शोधासाठी आणखी दोन पथके, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची माहिती

रेखा जरे हत्याकांड संदर्भामध्ये फरार आरोपी बाळ बोठे याच्या शोधार्थ अजून दोन पथके नियुक्त केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, पोलीस या घटनेचा गांभीर्याने तपास करीत आहेत, कोणालाही उपोषणाला बसण्याची वेळ येणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

रेखा जरे हत्याकांडाला तीन महिने पूर्ण झाल्यानंतर पाच आरोपींच्या विरोधात न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यातच काल तपासी अधिकारी अजित पाटील यांनी पारनेर येथील न्यायालयामध्ये बोठे याला फरार घोषित करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. घटना घडल्यापासून आरोपी फरार झालेला आहे. त्याचा शोध लागायला तयार नाही. या अगोदर पोलिसांनी पाच पथके नियुक्त केली होती. मध्यंतरीच्या काळामध्ये ती संख्या दोनवर आली होती. आता पुन्हा नव्याने तपासाला गती देण्याचे आदेश दिले असून, दोन पथके नियुक्त केली आहेत. या हत्याकांडाचा तपास पोलीस अतिशय योग्य पद्धतीने करीत आहेत. तपास योग्य दिशेने होत असल्यामुळे आरोपीसुद्धा लवकर सापडेल. यासाठी आम्ही पथके वाढवली आहेत. रुणाल जरे याने उपोषणाचा इशारा दिला आहे. यावर उपोषणाला बसण्याची वेळ येणार नाही. आम्ही योग्य पद्धतीनेच तपास करीत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

कार जरे कुटुंबाच्या ताब्यात देण्यास परवानगी

रेखा जरे यांची हत्या झालेली सॅन्ट्रो कार ताब्यात मिळावी यासाठी रेखा जरे यांचा मुलगा रुणाल याने न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने ही कार त्याच्या ताब्यात देण्यास परवानगी दिली आहे. मात्र, कारमध्ये कुठल्याही प्रकारचे नवीन बदल करण्यास मनाई करण्यात
आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या