
मोबाईल आणि ब्रॉडबँड या दोन्हींमध्ये रिलायन्स जिओ नंबर वन ठरले आहे. 5जी फिक्स्ड वायरलेस इंटरनेट क्षेत्रातही कंपनी अव्वल स्थानावर कायम आहे, अशी माहिती जेएम फायनान्शियलमधून समोर आली आहे. जिओने जानेवारीत सर्वाधिक नवीन ग्राहक जोडले आहेत. ट्रायने दिलेल्या माहितीनुसार, जिओने 16 लाख नेट वायरलेस युजर्स जोडले असून भारती एअरटेलने 12 लाख ग्राहक जोडले आहेत. व्होडाफोन-आयडियाचे 7 लाख ग्राहक कमी झाले आहेत. सध्या बाजारातील 41 टक्के हिस्सा जिओकडे आहे. एअरटेल दुसऱया स्थानावर आहे.
























































