
एसयूव्ही बाजारात पुन्हा धमाका करण्यासाठी रेनो इंडियाची आयकॉनिक एसयूव्ही ‘डस्टर’ कार मार्केटमध्ये येणार आहे. फ्रेंच वाहन निर्माता रेनो ग्रुपने याची घोषणा केली आहे. जवळपास पाच वर्षांनंतर या कारचे पुनरागमन होणार असून पुढच्या वर्षी प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारी 2026 रोजी अधिकृतपणे डस्टरला सादर केले जाणार आहे.
रेनो डस्टर हे केवळ एक नाव नाही, हे खऱ्या अर्थाने एक प्रतिष्ठत वाहन आहे. साहस, विश्वासार्हता आणि नवकल्पना यांचे ते प्रतीक आहे. भारतीय बाजारपेठेबद्दल आमची दृढ बांधिलकी आणि ग्राहकांच्या अपेक्षांना खोलवर प्रतिसाद देणारी वाहने सादर करण्याचा आमचा उद्देश यांचे ‘डस्टर’चे पुनरागमन हे एक प्रतीक आहे, असे रेनो ग्रुप इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन डेब्लेझ म्हणाले. जगभरातील जवळपास 18 लाखांहून अधिक ग्राहक आणि हिंदुस्थानातील 2 लाखांहून अधिक समाधानी मालकांसह ‘डस्टर’ने एक विशिष्ट स्थान व निष्ठावंत चाहतावर्ग निर्माण केला आहे, असेही स्टीफन डेब्लेझ म्हणाले.




























































