अक्षयपात्र, आयटीसी स्टोअरकडून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी आयटीसी लिमिटेडतर्फे आयटीसी केअर बास्केट हा उपक्रम अक्षयपात्राच्या सहयोगाने सुरू करण्यात आला आहे. उत्पन्नाचे साधन हिरावून घेतलेल्या व्यक्ती, कुटुंबे, समाजातील दुर्बल घटक, कारखान्यात काम करणारे कंत्राटी कामगार, मुंबईतील डबेवाले इत्यादींना मदत केली जाणार आहे. कोरोना काळात आयटीसी लि. आणि अक्षयपात्र यांनी सरकारला नियमित मदत केली आहे आणि किराणा, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून अनेकांना दिलासा दिला आहे. या उपक्रमाची व्याप्ती वाढवण्यासाठी सुजाण नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.