बोअर वेलमध्ये, एखाद्या दरीमध्ये किंवा समुद्रामध्ये कोणी पडलं तर त्यासाठी तासंतास शोधकार्य राबवण्यात आल्याच्या अनेक घटना देशभरात घडताना तुम्ही पाहिल्या असतील. मात्र कर्नाटकमध्ये एक वेगळीच घटना घडली असून समुद्रकिनाऱ्यावरील खडकांमध्ये पडलेला Iphone शोधण्यासाठी चक्क 7 तास शोधकार्य राबवण्यात आले आहे. त्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Instagram वर @antiliyachalets या अकाउंटवर सदर पोस्ट शेअर करण्यात आली आहे. सदर पोस्टमध्ये घटनेची माहिती देण्याता आली आहे. “हा व्हिडीओ कालच्या घटनेचा एक भाग आहे. आमच्या बंगल्यात राहणाऱ्या कर्नाटकातील एका महिलेचा 1,50,000 रुपये किमतीचा आयफोन समुद्रकिनाऱ्यावरील खडकांमध्ये पडला. वारा, पाऊस आणि समुद्राच्या जोरदार लाटांमुळे परिस्थिती आव्हानात्मक बनली होती. मात्र, केरळ फायर अँड रेस्क्यू सोबत अँटिलिया मोटोलच्या टीमने मोबाईल फोन काढण्यासाठी 7 तास कष्ट घेतले, ” असे पोस्टमध्ये म्हटल आहे.
View this post on Instagram