इमारतीतील रहिवाशांच्या रोगप्रतिकार शक्तीत वाढ, पहिल्यांदाच संपूर्ण मुंबईत सर्वेक्षण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तिसऱया सेरो सर्वेक्षण अहवालात उंच इमारतींमधील रहिवाशांच्या रोगप्रतिकारक शक्तीत वाढ झाली असून दाटीवाटीच्या आणि झोपडपट्टीतील रहिवाशांच्या रोगप्रतिकारक शक्तीत घट झाल्याचे समोर आले आहे. पहिल्यांदाच संपूर्ण मुंबईत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 36 टक्के नागरीकांमध्ये कोरोना रोगप्रतिकारक शक्ती तयार झाली आहे. पुरुषांमध्ये हे प्रमाण 35 टक्के तर महिलांमध्ये 37 टक्के इतके आहे.

मुंबईत सेरो सर्वेक्षणाच्या तिसऱया टप्प्यात 10 हजार 197 नागरीकांच्या रक्ताचे नमुन तपासण्यात आले. यात रक्तांमध्ये कोविड विषाणू विरोधात अँटिबॉडीज तयार झाली आहेत का हे पाहाण्यात आले. रक्तात अँटिबॉडीज तयार होणे म्हणजे आजाराविरोधात रोगप्रतिकारक शक्ती तयार होणे. अशी रोगप्रतिकार शक्ती मुंबईतील 36.30 टक्के नागरीकांमध्ये आढळली आहेत. आतापर्यंत तीन वेळा हे सर्वेक्षण झाले असून मार्च 2021 मध्ये पहिल्यांदाच संपूर्ण मुंबईत हे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात लसीकरण न झालेल्या नागरीकांची चाचणी करण्यात आली आहे.

महिला अधिक सक्षम

पुरुषांच्या तुलनेने महिलांमध्ये अधिक रोगप्रतिकारक शक्ती आढळून आली आहे. 35.02 टक्के पुरुषांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार झाली आहे तर 37.12 टक्के महिलांमध्ये ती आढळली.