लातूर जिल्ह्यात 8 मे ते 13 मेपर्यंत कठोर निर्बंध लागू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर जिल्ह्यात सतत वाढत असणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी जिल्ह्यामध्ये 8 मे ते 13 मे या कालावधीत कठोर निर्बंध लागू केले आहेत.

लातूर जिल्ह्यात महिन्याभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवार-रविवारचा कडक लॉकडाऊन त्याचप्रमाणे इतर निर्बंध लागू करूनही रुग्ण संख्या कमी होत नाही. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्णांचे होणारे मृत्यू काळजी वाढवणारे आहेत. मागील एक महिन्यात जिल्ह्यात दररोज एक हजारपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी 8 मे ते 13 मे या कालावधीत कडकडीत निर्बंध लागू केले आहेत.