
सामना ऑनलाईन । हैदराबाद
आंध्रप्रदेशमधील तिरुपती शहरात एका निवृत्त न्यायाधीशाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली आहे. सुधाकर असे त्या न्यायधीशाचे नाव असून त्यांच्या आत्महत्येची बातमी ऐकताच धक्का बसलेल्या त्यांच्या बायकोने काही तासानंतर त्याच ठिकाणी जाऊन आत्महत्या केली.
सुधाकर हे अतिरिक्त जिल्हा न्यायधीश म्हणून निवृत्त झाले होते. ते त्यांची पत्नी वरालक्ष्मीसोबत तिरुपती शहरात राहत होते. तर त्यांची दोन्ही मुलं संदीप व सबिथा हे कामानिमित्त बंगळुरूला राहतात. सुधाकर हे गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या आजाराने त्रासलेले होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे सुधाकर यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहलेले आहे.
summary : Retired Andhra judge, wife commit suicide, bodies found on railway tracks


























































