
समाजातील काही व्यक्ती आणि संस्था सामाजिक विषमतेची दरी कमी करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. समाजात विधायक काम करणारे आजही दुर्लक्षित आहेत. त्यांची पुरेशी दखल समाज घेत नाही, याचे शल्य वाटते, असे मत सर्वेच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांनी व्यक्त केले.
मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने देण्यात येणारा डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार समारंभात ते बोलत होते.या कार्यक्रमाला ज्येष्ठ मनोविकार तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी उपस्थित होते.गंभीर अपघातानंतर आलेल्या पॅरालिसिसच्या आव्हानावर मात करत, स्वतŠच्या अनुभवातून प्रेरणा घेऊन कमी खर्चात पुनर्वसनासाठी उपयुक्त साधने विकसित करणारे अर्णव महर्षी यांना, तर डॉ. अनिल अवचट स्मृती सृजन सन्मान पुरस्कार दृष्टीबाधित व्यक्तींसाठी बहुभाषिक ऑडिओ पुस्तके विनामूल्य उपलब्ध करून देणारा अभिनव उपक्रम राबवणाऱया प्राची गुर्जर यांच्या ‘यशोवाणी’ या गटास पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक म्हणाले, व्यसनाधीनता हे सामाजिक आवाहन बनले असून यावर वैचारिक मंथन करून मार्ग काढणे आवश्यक आहे.





























































