पाऊस पुन्हा बरसला, मुंबई- ठाणे परिसरात पावसाची हजेरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
taxi in mumbai rain

सामना ऑनलाईन, मुंबई

महिनाभर गायब झालेला पावसाने बुधवारी पहाटे हजेरी लावली. लालबाग, परळ, कांदिवली, बोरिवली, मालाड, गोरेगाव, वरळीत जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे उकाडय़ाने हैराण झालेल्या मुंबई, ठाणेकरांना काही अंशी दिलासा मिळाला.

यंदा जूनमध्ये काही दिवस, जुलै जवळपास संपूर्ण महिनाभर तर ऑगस्टचे 15 दिवस पावसाचे गेले. जुलै महिन्यांत तलाव क्षेत्रातही जोरदार पाऊस पडल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव भरून वाहू लागले. त्यानंतर 20 ऑगस्टनंतर मात्र मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पावसाने दडी मारली. त्यानंतर जवळपास महिनाभर गायब झालेल्या पावसाने मुंबई, ठाण्यात पुन्हा हजेरी लावली.

गुजरात किनारपट्टीवर चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाल्यामुळे मुंबईसह राज्यभरात पावसाच्या सरी कोसळल्या. हवामान खात्याने पुढील 48 तासांसाठी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. या परिस्थितीमुळे परतीच्या पावसाची वाट अजून सुरुवात झालेली नसल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.