डंपरच्या धडकेने रे रोडच्या पुलाचा खांब वाकला

299

हार्बर रेल्वेमार्गावरील रे रोडच्या पुलाच्या खांबालाच एका डंपरचालकाने धडक दिल्याने या पुलाचा खांब वाकून धोका निर्माण झाला आहे. या दुर्घटनेनंतर तत्काळ हा पूल बंद करण्यात आला. पूल बंद करण्यात आल्यामुळे त्यावरून जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. या पुलाची संरचनात्मक तपासणी करण्याचा निर्णय पालिकेने तातडीने घेतला आहे.

रे रोड येथील रेल्वे पुलाखालून जाणाऱ्या एका भरघाव डंपरने दुपारी साडेबाराच्या सुमारास धडक दिली. या धडकेमुळे पुलाचा लोखंडी खांब वाकला आहे. त्यामुळे या पुलालाच धोका निर्माण झाल्याने तत्काळ या रस्त्यांवरील तसेच पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. हा पूल आधीच धोकादायक असल्याने मोठ्या प्रमाणात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार होते. यासाठीची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे, परंतु या पुलावरील अनधिकृत झोपड्यांमुळे पुलाच्या दुरुस्तीचे काम थांबले होते. अपघातामुळे या पुलाच्या दुरुस्तीचे काम आता हाती घ्यावे लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या