रिया चक्रवर्तीला इंस्टाग्रामवर बलात्काराची धमकी, दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अभिनेत्री रिया चक्रवर्तीला इंस्टाग्रामवर दोन जणांनी धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तिने सांताक्रूझ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी दोन जणा विरोधात गुन्हा दाखल करून धमकी देणाऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्येनतंर वांद्रे पोलिसांनी रिया चक्रवर्तीचा जबाब नोंदवला होता. तर नेटकऱ्यांनी रियाला सोशल मीडियावर ट्रोल केले होते.

नुकतेच रियाला इंस्टाग्रामवर एका युझरने बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावर रियाने, मला गोल्ड डिगर, खुनी म्हणण्यात आले, चारित्र्यावर चिखलफेक केली तरी मी शांत राहिले. जर मी आत्महत्या केली नाही तर तुम्हाला माझ्यावर बलात्कार आणि हत्या करण्याच्या अधिकार कोणी दिला असे तिने त्या ट्विटला उत्तर दिले. अखेर शनिवारी सायंकाळी रियाने सांताक्रूझ पोलीस ठाणे गाठले. तिने दिलेल्या लेखी तक्रारीवरून सांताक्रूझ पोलिसांनी दोन जणा विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलीस इंस्टाग्रामची मदत घेणार आहेत. मेसेज पाठवण्याऱ्या त्या दोन अकाउंटची माहिती काढली जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या