रियाला जामीन मंजूर केला तर ती पुरावे नष्ट करेल! ड्रग्ज प्रकरणात एनडीपीएस कोर्टाचे निरीक्षण

694

ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीला जामिनावर सोडले तर ती इतर आरोपींना तपासाबाबत सावध करेल. ते सर्व आरोपी एकत्र मिळून पुरावे नष्ट करतील. त्याचा एनसीबीच्या तपासावर परिणाम होईल, असे निरीक्षण अंमली पदार्थविरोधी कायद्याच्या  विशेष न्यायालयाने नोंदवले आहे.  एनसीबीने रियाचा जबाब नोंदवून त्याआधारे तिचा या प्रकरणातील सहभाग उघड केला आहे. त्यामुळे तिचा जबाब बळजबरीने नोंदवल्याचे म्हणता येणार नाही, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. आरोपींमधील व्हॉट्सऍप चॅटिंग, पैशांच्या व्यवहाराचा तपशील तसेच इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे न्यायालयाने रियाचा जामीन अर्ज फेटाळताना विचारात घेतले.

एनडीपीएस कायद्याच्या कलम 27-ए अन्वये गुन्हा अजामीनपात्र असल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच एनसीबीने गोळा केलेले पुरावे विचारात घेतले. व्हॉट्सऍप चॅटिंग, रियाच्या क्रेडीट कार्डच्या सहाय्याने ट्रान्स्फर केलेली काही रक्कम व इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे एनसीबीच्या हाती आहेत. तसेच ड्रग्ज माफिया अनुज केसवानीकडून हस्तगत केलेल्या ड्रग्जचेही पुरावे असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

आपली प्रतिक्रिया द्या