
62 वर्षांच्या महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱया रिक्षाचालकाला सत्रन्यायालयाने दणका दिला आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणी दिंडोशी न्यायालयाने 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच दोघांमध्ये संमतीने शारीरिक संबंध असल्याचा आरोपीचा दावा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस एम आगरकर यांनी फेटाळून लावला.
21 सप्टेंबर 2018 रोजी बोरिवली येथे कामावर जात असताना आरोपीने महिलेला अडवले आणि तिच्या मुलाचा मित्र असल्याचे भासवले. आरोपीने महिलेची दिशाभूल केली आणि असा दावा केला की, लोकांनी तिच्या मुलाला हॉटेलमध्ये घेरले होते आणि तो मुस्लिम मुलीशी लग्न करण्याचा प्रयत्न करत आहे. आरोपीने महिलेला तिच्या मुलाकडे घेऊन जाण्याच्या बहाण्याने त्याच्या ऑटोरिक्षात बसवले, परंतु त्याऐवजी तिला एका निर्जन ठिकाणी नेऊन अत्याचार केले होते.



























































