आधी विनयभंग नंतर धावत्या रिक्षातून मुलीला ढकलले

महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला मालाड पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. केशव प्रसाद यादव असे त्या रिक्षाचालकाचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.

पीडित विद्यार्थिनी ही मालाड येथील एका महाविद्यालयात शिकते. सोमवारी सायंकाळी कॉलेज सुटल्यावर घरी जाण्यासाठी ती मालाडच्या एस. व्ही. रोड येथे रिक्षाची वाट पाहत उभी होती. तेव्हा तेथे एक रिक्षा आली. त्या रिक्षात बसून मुलीने प्रवास सुरू केला. केशवने रिक्षा सांगितलेल्या ठिकाणी न नेता दुसऱ्याच ठिकाणी तो घेऊन जाऊ लागला. त्याने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ती घाबरली. तिने रिक्षा थांबवण्यास सांगितली, मात्र त्याने रिक्षा न थांबवता तिला ढकलून दिले.