
हैदराबाद येथील एका शाळेत नर्सरीसाठी तब्बल 2.5 लाख रुपयांची फी आकारण्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावरील अनेक नेटकऱ्यांनी याविरोधात संतपा व्यक्त केला आहे. शिक्षणाची सुरुवातच एवढी महाग असेल तर पुढील शिक्षण घ्यायचे कसे, असा सवालही नेटकऱ्यांनी केला आहे. तसेच शाळांच्या मनमानी शुल्कवाढीविरोधात संताप व्यक्त करण्यात आला आहे.
हैदराबादमधील एका खाजगी शाळेच्या नर्सरीसाठी वार्षिक फी आकारण्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला कारण त्यात नर्सरीसाठी वार्षिक फी 2,51,000 रुपये असल्याचे नमूद केले आहे. धर्मा पार्टी ऑफ इंडियाच्या संस्थापक अनुराधा तिवारी यांनी एक्सवर एका पोस्टमध्ये फी स्ट्रक्चर शेअर केले. त्यामुळे देशातील मध्यमवर्गीय कुटुंबांतील मुलांनी शिक्षण कसे घ्यायचे, सर्वसामान्यांना शिक्षण कसे परवडणार याबाबत सोशल मिडीयावर चर्चा सुरू झाली आहे.
आता मुलांना ABCD शिकण्यासाठी दरमहा 21,000 रुपये खर्च येईल. या शाळा इतक्या मनमानी पद्धतीने शुल्क कसे लादत आहेत,असा सावल त्यांनी केला आहे. शाळेच्या फी स्ट्रक्चरनुसार, पूर्व-प्राथमिकची फी वार्षिक 2,42,700 रुपये आहे.तर इयत्ता पहिली आणि दुसरीची फी वार्षिक 2,91,460 रुपये आहे. काही नेटिझन्सनी उच्च फीबद्दल संताप व्यक्त केला आहे. तसेच शाळांच्या शुल्कवाढीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. तर काही नेटकऱ्यांनी अशा महागड्या शिक्षण संस्था टाळण्याचा सल्ला पालकांनी दिला आहे.
शिक्षण प्रक्रिया एक प्रकारचा घोटाळा बनली आहे. काही गोष्टींवर प्रभावीपणे नियंत्रण आणण्याची गरज आहे, असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. देशाच्या शिक्षण धोरणात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. बोर्डाच्या परीक्षा सोप्या असतात आणि स्पर्धात्मक परीक्षा कठीण असतात, त्यानंतर खाजगी कोचिंग येते आणि खाजगी कोचिंगमुळे देशाचे शिक्षण शुल्क आणि महागाई खूप जास्त आहे. मोठ्या संख्येने लोक खाजगी कोचिंग संस्थांमध्ये जातात आणि खाजगी कोचिंग संस्था त्यांच्या मनाप्रमाणे करतात आणि त्यांच्या मर्जीनुसार शुल्क वाढवतात, असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. याबाबत संबंधित शाळेकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.