‘रिंग ऑफ फायर’… 17 फेब्रुवारीला सूर्यग्रहण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येत्या 17 फेब्रुवारीला अमावस्येच्या दिवशी चंद्र सूर्य आणि पृथ्वीमधून जाईल त्या वेळी ‘रिंग ऑफ फायर’ सूर्यग्रहण दिसेल. या वेळी चंद्र पृथ्वीच्या सर्वात दूरच्या बिंदू जवळ असेल. त्यामुळे हे थोडे छोटे दिसेल. ग्रहणावेळी चंद्र सूर्याच्या 92 टक्के भागाला कव्हर करेल. त्यामुळे प्रकाशाचा एक भाग रिंगणासारखा दिसेल. ‘रिंग ऑफ फायर’चे हे दृश्य अवघे 2 मिनिटे 19 सेकंदांचे असेल. या वर्षातील सूर्यग्रहण पाहणे हे अनेक देशांसाठी मुश्कील आहे. कारण ते केवळ अंटार्क्टिकाहून पाहता येईल, तर दक्षिण अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेतून काही प्रमाणात पाहता येईल. दरम्यान, 28 फेब्रुवारीला रात्री आकाशात ग्रहांची परेड दिसणार आहे. या वेळी सहा ग्रह एका लाइनीत दिसतील. यामध्ये गुरू, युरेनस, नेपच्यून, बुध, शनी आणि शुक्र हे सर्व ग्रह एका रांगेत दिसतील. प्लॅनेटरी परेडचा हा नजारा हिंदुस्थानसह काही देशांत दिसेल.