ऋषभ पंतचे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन ।लंडन

इंग्लंड आणि हिंदुस्थानमध्ये नॉटिंगहॅमममध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऋषभ पंतला संधी देण्यात आली आहे. दिनेश कार्तिकच्या जागी त्याला संधी देण्यात आली आहे. ऋषभ पंत हा हिंदुस्थानचा 291 वा कसोटीपटू आहे.

rishab-pant

आजपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत. ऋषभ पंतचा संघात समावेश करण्यात आला आहे. तर शिखर धवन आणि जसप्रीत बुमराह यांचेही संघात पुनरागमन झाले आहे. दरम्यान इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.