झेल सुटला अन् पंतचा विश्वविक्रम हुकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन

हिंदुस्थानचा नव्या दमाचा यष्टीरक्षक रिषभ पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत विश्वविक्रमाची बरोबरी केली. या सामन्यात 11 झेल टिपत त्याने एका सामन्यात जास्त झेल पकडण्याचा मानही पटकावला आहे. पंतने पहिल्या डावात सहा झेल पकडले होते. त्यानंतर दुसऱया डावात त्याने 5 झेल टिपले. त्यामुळे एका सामन्यात 11 झेल पकडणारा तो पहिला हिंदुस्थानी, तर क्रिकेटविश्वातील तिसरा फलंदाज ठरला. याआधी इंग्लंडचा जॅक रसेल आणि दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स यांनी हा पराक्रम केला आहे. पण आतापर्यंत एकाही यष्टीरक्षकाला 12 झेल टिपता आलेले नाहीत. रिषभ पंतने नाथन लायनचा सोपा झेल सोडल्याने 12 झेल टिपून नवा विश्वविक्रम करण्याची त्याची संधी हुकली. या आधी हिंदुस्थानच्या वृद्धिमान साहाने याच वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन कसोटीत 10 झेल टिपले होते.
संक्षिप्त धावफलक
हिंदुस्थान ः पहिला डाव 250 धावा
ऑस्ट्रेलिया ः पहिला डाव 235 धावा
हिंदुस्थान ः दुसरा डाव 307 धावा
ऑस्ट्रेलिया ः दुसरा डाव 119.5 षटकांत 291 धावा
अॅडलेड कसोटी जिंकून विजयी सलामी दिल्याने आनंद होणे साहजिकच आहे, मात्र या विजयाने हुरळून जाण्याची गरज नाही. ही विजयाची मोहीम सुरू राहिली तरच समाधान लाभेल. या विजयामुळे संघाला आत्मविश्वास मिळाला एवढे नक्की. पहिल्या दिवसानंतर खेळपट्टीकडून फारशी मदत मिळत नसताना 20 बळी घेणे ही सोपी गोष्ट नाही. चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांनी चांगली फलंदाजी केली म्हणून गोलंदाजांना बचावासाठी पुरेशा धावा मिळाल्या. त्यांचेही कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. विजय मिळाला असला तरी काही चुकाही झाल्या. त्या दुरुस्त करून पुढे जायचे आहे.
 विराट कोहली (कर्णधार, हिंदुस्थान)
हिंदुस्थानला विजयाचे श्रेय द्यायलाच हवे. त्यांच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी आपल्याहून सरस खेळ केला. चेतेश्वर पुजाराने उभय संघांमध्ये अंतर निर्माण केले. फलंदाजीतील अपयश आमच्या पराभवास कारणीभूत ठरले. तळाच्या फलंदाजांनी हिंदुस्थानी गोलंदाजांचा शर्थीचा सामना केला, पण ते पराभव टाळू शकले नाहीत.
टीम पेन (कर्णधार, ऑस्ट्रेलिया)
दृष्टिक्षेपात….
71 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत पहिला सामना जिंकण्याची हिंदुस्थानची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामना जिंकणारा विराट कोहली पहिला आशियाई कर्णधार. या आधी राहुल द्रविड आणि महेंद्रसिंह धोनी यांनी इंग्लंड व दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामना जिंकला आहे, मात्र ऑस्ट्रेलियामध्ये दोघांनाही अपयश आले होते. विशेष म्हणजे विराटच्या नेतृत्वाखाली एकाच वर्षात ‘टीम इंडिया’ला या तिन्ही देशांमध्ये विजय मिळाले आहेत.
एका कसोटी सामन्यात यष्टीमागे 11 झेल पकडत ऋषभ पंतने महेंद्रसिग धोनी आणि वृद्धिमान साहा यांच्या अधिक झेलांच्या विक्रमाला मागे टाकले. धोनी आणि साहा यांच्या नाकाकर अनुक्रमे 9 व  10 झेल जमा आहेत. याचसोबत पंतने एबी डिव्हिलियर्स आणि जॅक रसेल यांच्या 11 झेलांच्या विक्रमाशीही बरोबरी केली.
ऑस्ट्रेलियामध्ये खेळलेल्या 45 कसोटींत हिंदुस्थानने केवळ 6 विजय मिळविले आहेत. 20 कसोटींत पराभव तर 11 सामने अनिर्णीत राहिले आहेत. ऑस्ट्रेलियात कसोटी सामना जिंकणारा विराट कोहली पाचवा हिंदुस्थांनी कर्णधार ठरला. या आधी 1977 मध्ये बिशनसिंह बेदीच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियामध्ये पहिले दोन कसोटी सामने जिंकले होते. त्यानंतर सुनील गावसकर, सौरभ गांगुली व अनिल कुंबळे यांच्या नेतृत्वातही ‘टीम इंडिया’ने ऑस्ट्रेलियात कसोटी जिंकलेली आहे.
एका कॅलेंडर कर्षांमध्ये परदेशी खेळपट्टय़ांकर 3 कसोटी सामने जिंकण्याची हिंदुस्थानची ही दुसरी केळ ठरली. या आधी 1968 साली हिंदुस्थानने प्रथम अशी कामगिरी केली होती.
ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत पहिला सामना जिंकणारा हिंदुस्थान दुसरा आशियाई देश ठरला आहे. या आधी 1978-79 साली पाकिस्तान संघाने मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता.