चौथ्या क्रमांकावर खेळायला उतरले दोन फलंदाज, टीम इंडियातील गोंधळ उघड

1056
rishabh-pant-shreyas-iyer

टीम इंडियाचा चौथ्या क्रमांकाचा पेच अजून सुटलेला नाही. गंभीर बाब म्हणजे हा प्रश्न आता थेट मैदानावर उघड झाला आहे. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर दोघेही मैदानाकडे निघाल्यावर सारेच बुचकळ्यात पडले. अखेर कर्णधार विराट कोहलीला पुढे येऊन स्पष्टीकरण द्यावे लागले आहे.

हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 लढतीत अजब चित्र पाहायला मिळालं. पहिले दोन फलंदाज बाद झाले. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर हे दोघेही मैदानाकडे चालले होते. नक्की कोण मैदानात उतरणार हे दोघांनाही ठावूक नव्हते. अखेर पंतलाच चौथ्या क्रमांकावर मैदानात उतरवण्याचा निर्णय झाला. पंत 19 धावाकरून माघारी परतला.

दरम्यान, सामना संपल्यानंतर विराट कोहलीला या प्रकारावर स्पष्टीकरण द्यावं लागले. फलंदाजांपर्यंत संदेश पोहोचला नसल्या कारणाने ते दोघेही एकाचवेळी मैदानाकडे जात होते, असे कोहलीने स्पष्ट केले. ते दोघेही मैदानात उतरले असते तर तीन फलंदाज दिसल्याने गोंधळ उडाला असता, असेही कोहली यावेळी म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या