‘झापुकझुपुक’ फेम सूरज चव्हाण याने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली. अतिशय गरीब कुटुंबातून आलेल्या सूरजचे यश मोठे आहे. आईवडीलांचे छत्र हरवलेला, शिक्षण न मिळालेल्या सूरजला सोशल मीडियामुळे प्रसिद्धी मिळाली. तो रिल स्टार आहे. बिग बॉस जिंकल्यानंतर शोचे होस्ट रितेश देशमुख याने सूरजला खास गिफ्ट दिले. त्यांनी सूरजला एक पीए दिला आहे. याबद्दल मुलाखतीत सूरज म्हणाला, रितेश सरांनी मला खूप पाठिंबा दिला. त्यांनी मला त्यांच्याजवळचा एक पीए दिला आहे. रितेश सर म्हणाले स्वतःची काळजी घे. सगळ्या गोष्टी नीट समजून घे. मी एक माणूस देतो, त्याच्या कायम संपर्कात राहायला त्यांनी मला सांगितले. टिकटॉक आणि इन्स्टाग्रामवर रिल स्टार असणाऱ्या सूरजची एकेकाळची कमाई 80 हजार रुपये होती. पण अशिक्षित असल्यामुळे अनेकांनी त्याची फसवणूक केली. यावेळी त्याची फसवणूक होऊ नये म्हणून रितेश देशमुख याने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.