लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही! रविंद्र चव्हाणांच्या विधानावर रितेश देशमुख काय म्हणाला, वाचा सविस्तर

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले. लातूर शहरातून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील याची आपल्या मनात कोणतीही शंका नाही, असे ते म्हणाले. त्यांच्या विधानावरून लातुरात संतापाची लाट उसळली असताना आता विलासरावांचा मुलगा आणि अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) यांने रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावर खणखणीत शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.

रितेश देशमुख याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. “दोन्ही हात जोडून सांगतो, जनतेसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं. कोरलेलं नाही. जय महाराष्ट्र”! अशा निवडक शब्दांमधून रितेशने चव्हाणांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. रितेशने अपलोड केलेल्या या व्हिडीओला सर्वांनी पसंती दर्शवली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

लातुरात महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून, लातूरातून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील असे गरळ ओकले. रविंद्र चव्हाणांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांनी माफी मागावी आणि आपले विधान बिनशर्त मागे घ्यावे अशी मागणी काॅंग्रेस कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

अमित देशमुखांची तीव्र नाराजी

रवींद्र चव्हाण यांनी असं विधान करायला नको होते. लातूरची किंवा महाराष्ट्राची ही संस्कृती नाही.मी त्यांच्या विधानाचा निषेध करतो असं अमित देशमुख यांनी म्हटले आहे.

विलासरावांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील! भाजपच्या रवींद्र चव्हाण यांचे वादग्रस्त वक्तव्य