दरोडा टाकण्यापूर्वी चोरट्यांना केले गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोरेगाव पूर्व येथील एका दुकानात दरोडा टाकण्यासाठी आलेल्या जोहरुद्दीन जाकीर हुसेन उर्फ बडा कालू, रोहित कासोर आणि अक्षय कोलेकर या तिघांना दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे, तर अन्य तिघेजण पळाले आहेत.

गोरेगाव पूर्वच्या ओम सत्यम सुपर मार्केट येथे काहीजण दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची माहिती दिंडोशी पोलिसांना मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक डॉ. चंद्रकांत घार्गे, दराडे, उपनिरीक्षक कन्हेरकर यांच्या पथकाने सापळा रचला. रविवारी पहाटेच्या धीरज सोसायटीजवळ दरोडा घालण्यासाठी सहाजण आले. ही टोळी दुकान पह्डत असतानाच दिंडोशी पोलिसांचे पथक तेथे गेले. अंधाराचा फायदा घेऊन तीन जण पळाले. त्यातील बडा कालू, अक्षय आणि रोहितला पोलिसांनी ताब्यात घेतले. बडा कालू हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार असून तो मुख्य सूत्रधार आहे.