लॉकडाऊनच्या काळात लातूरमध्ये घरफोडी; सुमारे 4 लाखांचा ऐवज पळवला

646

कोरोनाचा फैलीव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. या लॉडाऊनच्या काळात लातूरमध्ये घरफोडीची घटना घडली आहे. लातूर शहरातील विशाल नगर भागातील घर अज्ञात चोरट्यांनी फोडले आणि घरातील 3 लाख 94 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरले.

या चोरीप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात राजपाल भगवंत माने यांनी तक्रार दिली आहे. त्यात नमूद केले आहे की, ते आपल्या कुटूंबियांसह बेडरुमध्ये झोपले होते. अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाज्याचा कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश केला. तक्रारदाराच्या पत्नीच्या हातामधील सोन्याच्या बांगड्या, पाटल्या, गळ्यातील गंठण, तुळशीची माळ असे सुमारे 19 तोळे 7 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरले. 3 लाख 94 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात न्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक नेहरकर करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या