विम्बल्डन : रॉजर फेडररचा दिमाखात तिसऱ्या फेरीत प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | लंडन

आठ वेळा विम्बल्डनचे जेतेपद पटकावणाऱ्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने आपली विजयी दौड कायम राखत तिसऱ्या फेरीत मजल मारली आहे. अब्जावधी टेनिसशौकिनांच्या हृदयात स्थान मिळवणाऱ्या फेडररने पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत स्लोवाकियाच्या लुकास लॅकोवर ६-४, ६-४, ६-१ असा सहज विजय मिळवला.

विक्रमी नवव्या विम्बल्डन विजेतेपदाकडे कूच करताना स्विस सुपरस्टार फेडररने आपली खेळातली मास्टरी अफलातून सादर केली. चौथ्या फेरीत रॉजरची गाठ क्रोएशियाचा इवो कार्लोविक किंवा जर्मनीचा जान लेनार्ड स्ट्रफ यांच्यातील विजयी खेळाडूंशी पडणार आहे