राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी रोहित पवार यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदावर शशिकांत शिंदे यांची निवड करण्यात आली. त्यापाठोपाठ आमदार रोहित पवार यांची प्रदेश सरचिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या सर्व फ्रेंटल आणि सेलच्या प्रभारीपदाची जबाबदारीही रोहित पवार यांच्यावर सोपविण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘एक्स’ पोस्ट करत ही माहिती दिली आहे.